प्रत्येक मातेची इच्छा असते की तिच्या बाळांला चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद द्यावा. हेपॅटिटिस ए, मस्तिष्कदाह, फ्लू, डिटीपी, इ. सारख्या गंभीर आजारापासून मुलांचे संरक्षण करून तुमच्या इच्छांमध्ये अधिक शक्ती लसीकरण आणते. तुमच्या बालकाच्या लसीकरण नोंदीचा लसीकरण कार्डसह मागोवा घ्या.
एक लसीकरण कार्ड (काहीवेळा इम्युनिझेशन कार्ड म्हणून ही ओळखले जाते) तुमच्या बालकाने प्राप्त केलेल्या सर्व लसींचा इतिहास प्रदान करते आणि आगामी लसीकरणाचा मागोवा ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे तुमच्याकडून एक ही चुकविला जाणार नाही.
सर्वसाधारणपणे, एक लसीकरण कार्ड हे तुम्हाला बालरोगतज्ञांद्वारे प्रदान केले जाते. वयाच्या 18 वर्षापर्यत शिफारशित केलेल्या लसींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
लसीकरण कार्ड हा तुमच्या बालकाच्या आरोग्याचा परवाना आहे.
आजच आपल्या बालकाचे लसीकरण कार्ड तपासा आणि तुमच्या बालरोगतज्ञासोबत त्याचे लसीकरण वेळेवर पूर्ण करण्यासाठी सल्ला घ्या.

तुम्हाला बालकाच्या लसीकरण बद्दल काही प्रश्न आहेत?
तुमच्या शंकांची उत्तरे मिळवण्यासाठी खाली दिलेले वाचा:
- वैद्यकीय शास्त्राची सातत्याने प्रगती होत आहे, आणि याच प्रगतीचा भाग म्हणून वर्षामध्ये नवीन लसींचा विकास होत आहे
- लसीकरण मधून, आजच्या काळामध्ये जन्मलेल्या बालकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकणाऱ्या गंभीर आजारापासून, जे जीवघेणे होऊ शकता अशापासून, संरक्षण करण्याची संधी मिळत आहे
- प्रत्येक लसीकरण महत्वाचे आहे
- तुमच्या बाळाच्या लसीकरण च्या नोंदीचा मागोवा लसीकरण कार्ड चे तत्परतेने अनुसरण करून तुम्ही ठेवू शकता.
- तुमच्या बाळाला त्याचा किंवा तिचा पहिला डोस मिळताच तुमच्या बाळाच्या लसीकरण नोंदीचा मागोवा ठेवणे सुरू करा.
- लसीकरण कार्ड हे तुमच्या बाळाच्या आरोग्याचा परवाना आहे
- तुमच्यासाठी हे महत्वाचे आहे की तुम्ही तुमच्या बाळाच्या लसींच्या नोंदींना जतन करावे आणि त्यांना अद्ययावत ठेवावे, कारण जेव्हा तुम्ही त्यांना शाळा, बाल सुश्रुषा, उन्हाळी शिबीरे या साठी नोंदणी करताना किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी त्यांना प्रदान करण्याची आवश्यकता असू शकते
- तुम्ही तुमच्या बालकाच्या लसीकरण नोंदीची प्रत राखता तेव्हा:
- i. नोंदी अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा ज्याला तुम्ही सहजपणे शोधू शकाल
- ii. तुमच्या बालकाच्या डॉक्टरांच्या प्रत्येक भेटीला ते सोबत ठेवा
- iii. तुमच्या बालकाच्या लसीकरण नोंदीवर दिलेली लस, दिनांक आणि मात्रा यांना लिहीण्यास डॉक्टर किंवा परिचारिका यांना सांगा
- iv. डॉक्टरांच्या कार्यालयाचे किंवा चिकित्सालयाचे नाव जिथे तुमच्या बाळाला डोस मिळाला ते लिहा, ज्यामुळे जेव्हा तुम्हाला अधिकृत नोंदीची गरज पडेल तेव्हा ते कोठे मिळेल हे तुम्हाला माहीत होईल
- बालकाच्या चांगल्या आरोग्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक असल्याची शिफारस जगभरातील आरोग्य प्राधिकरणे करतात
- तथापि, कोणत्याही कारणासाठी, तुमच्या बालकाची कोणतीही लस मात्रा, ज्यासाठी ते पात्र आहेत, ती चुकली असल्यास /प्राप्त झाली नसल्यास, तुम्ही कॅच-अप लसीकरण साठीच्या पर्यायाला स्वीकारू शकता
- कॅच-अप लसीकरण हा एक वैकल्पिक मार्ग आहे जो ज्या आजारांसाठी संरक्षण देय आहे किंवा चुकलेले आहे त्याच्या विरोधात इष्टतम संरक्षण प्रदान करतो
- कृपया कॅच-अप लसीकरण वरील अधिक माहितीसाठी तुमच्या बाल रोग तज्ञांबरोबर सल्लामसलत करा
- तुमच्या बालकाच्या लसीकरण च्या नियमित आठवणी तुम्ही प्रतिक्षम करण्याच्या मोफत सेवेसाठी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स च्या इम्युनाईज इंडिया अॅपला डाउनलोड करून आणि नोंदणी करून निवडू शकता.Google's Playstoreआणि IOS Appstoreयेथून अॅप डाउनलोड करा.
- आठवण करून देणे कोणत्याही लस ब्रॅण्ड किंवा उत्पादने यांची जाहिरात करणे, शिफारस करणे किंवा प्रोत्साहन देणे करत नाही